राष्ट्रवादी काँग्रेसध्ये बंड घडवून जवळपास तीन डझन आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जाऊनही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ न सोडणारे माजी मंत्री राजेश टोपे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांसोबत दिसले. विशेष म्हणजे, टोपे आणि अजितदादांनी एकत्रच सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट बुचकळ्यात पडले आहेत.बंड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येAJIT PAWAR आणि शरद पवार असे दोन गट पडले. अजितदादांनी आपल्या गटात ४० आमदार असल्याचा दावा केला. तर पवार गटाने १९ आमदार आपल्याकडे असल्याचे सांगितले. मात्र दोन्ही गटाकडून अधिकृत संख्या आणि नावे जाहीर केलेली नाहीत. अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाच्या समर्थक आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर ‘व्हिप’ बजावून कारवाई करण्यार असल्याचे प्रतोद अनिल पाटील यांनी स्पष्ट केले होते.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलन केले. यात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार सहभागी झाले होते. मात्र बैठक असल्यानेSHARAD PAWAR गटातील आमदार आंदोलनासाठी उपस्थित नव्हते. अशा स्थितीत मात्र शरद पवार यांचे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री राजेश टोपे यांनी अजित पवार यांच्यासह सभागृहात प्रवेश केला. यामुळे राजेश टोपे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.