• Mon. Jun 23rd, 2025

‘घटनाबाह्य, कलंकीत’ म्हणत विरोधकांचा थेट शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Byjantaadmin

Jul 17, 2023

राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या कलंकीत शब्दावरून उठलेले वादळ आज विधानभवनात धडकले. त्यातून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष करीत विरोधकांनी पायऱ्यावर बसून भलामोठा ‘घटनाबाह्य’ आणि ‘कलंकीत’ या उल्लेखाचा बॅनर झळकवला. परिणामी अधिवेनाच्या पहिल्या दिवसाचा पहिला तास गोंधळाचा झाला. राज्याचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारी (ता. १७) सुरू झाले. तत्पूर्वी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. राज्य सरकारवर खोके सरकार असल्याचा घणाघात करण्यात आला. तसेच ‘घटनाबाह्य’, ‘कलंकीत’ सरकार असाही फलक विरोधकांनी झळकवला.

Opposition Leaders At Vidhimandal

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रज्य सरकारच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे विरोधकांनी पायऱ्यावर उभे राहून आंदोलन केले. या आंदोलनात congress , ठाकरे गटाच्या आमदारांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी ‘खोके सरकार हाय-हाय’ अशी घोषणा दिल्या. यावेळी काळ्या रंगात व पांढऱ्या अक्षरात विरोधकांनी झळकवलेल्या फलक लक्षवेधी ठरला. यावर “घटनाबाह्य, कलंकीत सरकारचा धिक्कार असो!”, असा उल्लेख करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर हे पहिले अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही गटांकडून आपल्या समर्थक आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या बैठकीसाठी उपस्थित असल्याने या आंदोलनात विरोधातील शरद पवार गटाच्या आमदारांनी सहभाग घेतला नाही. या बैठकीतून दोन्ही गटांचे संख्याबळ स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बैठकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान, काँग्रेसच्या nana patole यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “विरोधी पक्षनेते पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. आता जनतेने आमच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यातील सरकार हे लुटारू आहे. त्यांच्याकडे स्वतःचे असे काहीच नाही. त्यांनी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे जनतेला समजले आहे.”

https://twitter.com/ANI/status/1680810981101047809?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1680810981101047809%7Ctwgr%5Eb2c02fa437903f37b38dc33d5cbc5889356218f8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Fmumbai%2Fmaharashtra-monsoon-session-opposition-leaders-attack-on-eknath-shinde-and-devendra-fadnavis-sd87

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *