उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाल्यामुळे ठाकरेंना सोडून तिकडे गेलेल्या आमदारांना आता परत येण्यास हरकत नाही, असा चिमटा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिंदे गटाच्या आमदारांना काढला आहे.अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सरकारमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानंतर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाले आहे. यामुळे अजित पवारांवरच टीकेची झोड उठवत शिवसेनेत बंडाळी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांची मोठी गोची झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी या आमदारांचा चिमटा काढला आहे.
एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा अजित पवारांकडेच अर्थ खाते आले आहे. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी तिकडून इकडे येण्यास हरकत नाही, असे अशोक चव्हाण म्हणालेत.सध्याचे राजकारण IPL सारखे झाले आहे. त्यात आपण कुठे फिट बसतो? असा प्रश्न माझ्यासारख्या माणसांना पडतो. मी माध्यमांशी संवाद साधतातना खूप सावधपणे बोलतो. सध्या राजकारणाचा स्तर घसरला आहे. आयपीएलसारखी बोली सुरू आहे. पक्षांतर, अपात्रतेचा मुद्दा आहे. पण कायद्याचीच पायमल्ली केली जात आहे. हे अत्यंत गंभीर आहे, असे चव्हाण म्हणाले.न्यायालयातही तारखांवर तारखा सुरू आहेत. न्याय मिळण्यास विलंब होत आहे. राजकारणाची दिशाही कळत नाही. कोण कुठल्या पक्षात जात आहे, कोणत्या गटात आहे, हाच मोठा कार्यक्रम झाला आहे, अशी उद्विग्नताही यावेळी चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवली.
अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपसोबत जाणार, 4 मंत्रिपदेही मिळणार असल्याची चर्चा; चव्हाणांनी शक्यता फेटाळली
काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या 11 आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहेत. तसेच, त्यांच्या गटाला 4 मंत्रिपदेही मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, ही शक्यता साफ फेटाळून लावत मी काँग्रेसमध्येच राहणार, असे स्वत: अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या कोठून येतात?
माजी मुख्यमंत्री अशोक चौहान सध्या नांदेडमध्ये आहेत. भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता कोठून उडत आहे? अशी नाराजाही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, काल शुक्रवारी नांदेडमध्ये झालेल्या बैठकीतच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार आहे