• Tue. Jun 24th, 2025

हॉलमार्क नोंदणीकृत सराफाकडून एचयुआयडी. चिन्हांकित दागिन्यांची खरेदी करावे – बीआयएसचे निरीक्षक रमण कुशवाहा

Byjantaadmin

Jul 13, 2023
हॉलमार्क नोंदणीकृत सराफाकडून एचयुआयडी. चिन्हांकित दागिन्यांची खरेदी करावे – बीआयएसचे निरीक्षक रमण कुशवाहा
लातूर –हॉलमार्क नोंदणीकृत सराफाकडून एच. यु. आय. डी. चिन्हांकित दागिन्यांची खरेदी करावे असे आवाहन पुणे येथील बीआयएस. चे निरीक्षक रमण कुशवाहा यांनी बोलताना केले आहे.लातूर शहरातील सुभाष चौकात असलेल्या पदवीपन हॉलमध्ये लातूर सराफ सुवर्णकार बांधवांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना रमण कुशवाहा म्हणाले की  ग्राहक व व्यापारी यांच्यामध्ये विश्वासाचा जो व्यवहार होतो, त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम बीआयएस हे हॉलमार्कच्या चिन्हाद्वारे करते.अनेक वेळा असेही निदर्शनास आले आहे की, बनावट हॉलमार्क केलेले दागिने ग्राहकांना मोठा नफा  घेऊन विकले जातात. म्हणून बीआयएस चिन्ह कॅरेटमधील शुद्धता, सूक्ष्मता आणि दागिन्यांवर क्रमांकासह एचयुआयडीसह संपूर्ण बीआयएस हॉलमार्क कोरलेला तपासून घेणे महत्त्वाचे आहे. हॉलमार्क युनिक आयडी प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर कोरलेला एक विशिष्ट कोड असतो, जो त्यावर चिन्हांकित बीआयएस हॉलमार्कला प्रमाणीत करतो.
ग्राहकांनी यापुढे ज्या सराफ दुकानाच्या पेढीच्या दर्शनी भागांमध्ये हॉलमार्कचा लोगो लावला आहे, त्याच सराफ पेढीमधून एचयुआयडी प्रमाणित दागिन्यांची खरेदी करावी व स्वतःची दुकानदाराकडून होणारी फसवणूक टाळावी असे आवाहन त्यांनी बोलताना केले. यावेळी बीआयएस. निरीक्षक अमन सिंह यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रताप किणीकर यांनी केले.  यावेळी सौरभ ताथोडे, विवेक जानते, रामभाऊ चलवाड, मोहन रामेगावकर, राजाभाऊ बोकन, गोविंद चिंचोलीकर, राजूसेठ सुराणा, संतोष गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यशोदा हॉलमार्क सेंटरचे संचालक शुभम पाटील यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *