भारत जोडो यात्रा नियोजना संदर्भा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
लातूर (प्रतिनिधी):-काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली येथून पूढे जाणार आहे. हिगोली येथील यात्रेच्या नियोजना संदर्भात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी हिंगोली शहरातील शिवलीला पॅलेस हॉटेलमध्ये हिंगोली जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार तथा प्रदेश काँग्रेसचेसरचिटणीस धीरज विलासराव देशमुख, विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार तथा हिंगोली जिल्हा काँग्रेस प्रभारी सचिन नाईक, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव देसाई, हिंगोली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पवन उपाधे, हिंगोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बापूराव पाटील शेनगाव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्करराव वेंगाळ, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, समद पटेल, विजय देशमुख, प्रवीण पाटील, रवी काळे, प्रमोद जाधव, इमरान सय्यद, भारत जोडो यात्रा समन्वयक सचिन गुंजाळ, संजय देशमुख, दाजीबा पाटील, बाजीराव जुंबडे, हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी कर्डिले, माजी नगराध्यक्ष सुरेश सराफ, शेख निहाल, जकी कुरेशी, डॉ.अंकुश देवसरकर, विलास गोरे, आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, हिंगोलीत येण्याचा आज योग आला याचा मला आनंद आहे. काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्याच्या भारत जोडो यात्रेचे निरीक्षक म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी सुपूर्द केली आहे असू सांगून आपल्या समवेत भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही सामील झालो आहोत. हिंगोली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी हे हिंगोलीत भारत जोडो यात्रेसाठी येत आहेत, भारत जोडो यात्रा शतकातून एखाद्या वेळी जन्माला येते. हिंगोली जिल्ह्यातील यात्रा अभूतपूर्व होईल या यात्रेत सामील होण्यासाठी महाराष्ट्रातून लोक हिंगोलीत येणार आहेत. काँग्रेसने सर्व काही आजवर कार्यकर्त्यांना दिले आहे. आता कार्यकर्त्यांनी काँग्रेसला वेळ द्यावा, काँग्रेसचे नेते माजी खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन झाले, आज राजीव सातव हे असते तर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत सावलीसारखे भारत जोडो यात्रेत उभे राहिले असते असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते आमदार देशमुख म्हणाले की, हिंगोली जिल्ह्याला आपणाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे.काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा तिरंगा भारताच्या संसदेवर भडकावयाचा आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ही काँग्रेस जिंकेल प्रत्येक गावामध्ये भारत जोडो यात्रेबाबत दवंडी द्यावी असे सांगून त्यांनी हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील जनतेने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार तथा हिंगोली जिल्हा काँग्रेस प्रभारी सचिन नाईक, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव देसाई यांनी या आढावा बैठकीचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन व आभार शामराव जगताप यांनी मानले.