जनता एक्सप्रेस दिवाळी अंकाचे माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शानदार प्रकाशन
निलंगा:-गेल्या 10 वर्षांपासून सतत विविध विषयावर प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक जनता एक्सप्रेस दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, काळाची गरज ओळखुन जनता एक्सप्रेस ने विविध विषयावर दिवाळी अंक प्रसिद्ध केले आहेत .त्याच बरोबर जनता एक्सप्रेस न्युज वेब पोर्टेलच्या माध्यमातून दिवसभराच्या ताज्या घाडामोडी वाचकांपर्यंत पोचविण्यात यशस्वी झालेत . कमी कालावधीत लाखों वाचकांत पोहचणे हे जिकरीचे काम चिकाटी व मेहनतीच्या बळावर जनता एक्सप्रेसने पूर्ण केला आहे .ग्रामीण भागातील पत्रकारितेला ही बाब अभिमानस्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले .व जनता एक्सप्रेस परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी सभापती इरफान सय्यद ,शेषेराव ममाळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे, माजी अध्यक्ष हरिभाऊ सगरे, सचिव झाटिंग अण्णा म्हेत्रे, पत्रकार सर्वश्री परमेश्वर शिंदे, सुधीर रामदासी,श्रीशैल्य बिराजदार, माधव पिटले, मिलिंद कांबळे,शिवाजी पारेकर,विशाल हलकीकर, अस्लम झारेकर,रविकिरण सूर्यवंशी,रमेश शिंदे,साजिद पटेल,तुकाराम सूर्यवंशी,रमेश शिंदे,आदी उपस्थित होते. यावेळी संपादक मोईज सितारी,कार्यकारी संपादक अय्युब बागवान यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.