• Tue. Jun 24th, 2025

छत्रपती चौक ते कव्हा तळे रस्त्याची दुरावस्था: नागरिकांच्या तक्रारीची माजी मंत्री, आ.अमित देशमुख यांच्याकडून दखल

Byjantaadmin

Jul 12, 2023

छत्रपती चौक ते कव्हा तळे रस्त्याची दुरावस्था: नागरिकांच्या तक्रारीची
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून दखल
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना लातूर शहरातील छत्रपती चौक ते कव्हा लेक (कन्हेरी खोपेगाव रिंग रोड) रस्त्यावरखड्डे पडून रस्त्यालगत झाडे, झुडपे वाढून रस्ता अरुंद झाला आहे. सध्या पाऊस पडल्यानंतर नागरीकांना तेथे येजा करण्यासाठी अडचणी येऊन यारस्त्यावर किरकोळ अपघातही होत असल्याची माहीती, काँग्रेस पदाधिकारी संजय निलेगावकर व परिसरातील नागरिकांनी देऊन समस्या सोडवण्याची विनंती केली. या छत्रपती चौक ते कव्हा लेक (कन्हेरी खोपेगाव रिंग रोड) रस्त्यावरील अडचणींची माहीती मिळताच माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नीलकंठ यांना रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करून, रस्त्यालगतची झाडे, झुडपे काढण्याच्या सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने छत्रपती चौक ते कव्हा लेक (कन्हेरी खोपेगाव रिंग रोड) ची झाडे झुडपे काढून रस्त्यातील खड्याची दुरुस्ती केली आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी छत्रपती चौक ते कव्हा लेक (कन्हेरी खोपेगाव रिंग रोड) रस्त्याची दखल घेऊन समस्या सोडवल्याबद्दल काँग्रेस पदाधिकारी संजय निलेगावकर व परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *