• Wed. Jun 25th, 2025

आज अजून एक शपथविधी? मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले..

Byjantaadmin

Jul 12, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची सातत्याने चर्चा सुरू आहे. त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलं आहे. यामुळे आता आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शपथविधी देखील पार पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. काल रात्री पुन्हा एकदा वर्षावर उशीरा रात्रीपर्य़ंत बैठक पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. तसेच, त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. तिन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची बोलले जात आहे. यामुळे आज तरी याबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत राजभवन येथे लगबग सुरू असल्याचीही चर्चा आहे.

पहिल्यांदा तिसराVISTARपार पडेल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून खातेवाटपाची घोषणा करण्यात येईल असे समजते आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाकडून विशिष्ट खात्यांवर दावा केला जात आहे. अर्थ,सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खात्यांवर अजित पवार गटाने हट्ट धरला असल्याची माहिती आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांचा AJIT PAWAR यांना अर्थ खातं देण्यास तीव्र विरोध आहे, अशीही चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *