औरंगाबाद
हर्सूल सावंगी येथील समृद्धी महामार्गावर गेट क्रमांक १६ जवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून यामध्ये २० जण जखमी झाले आहेत. यापैकी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ९ जणांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की परिसरामध्ये मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. एका पाठोपाठ एक भीषण अपघात या समृद्धी महामार्गावर होत आहेत. काही दिवसांपूर्वी बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तब्बल २५ निष्पाप जणांचा जीव गेला होता. ही घटना ताजी असत शहरातील हर्सूल सावंगी परिसरामध्ये असलेल्या समृद्धी महामार्गावर काल मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला.खुराणा या खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहेदरम्यान, या भीषण अपघातानंतर परिसरामध्ये मोठ्याने आवाज झाला. आवाज ऐकताच नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीय. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.