पुणे, 11 जुलै : पाकिस्तानी तरुणी झारादास गुप्ताच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याने दोन इतर महिलांना डीआरडीओच्या कार्यालयात बोलवून अत्याचार केली असल्याची धक्कादायक माहिती एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे.डीआरडीओचा संचालक असलेल्या कुरूलकरची एक एक कृष्णकृत्यं समोर येत आहेत. झारा दास गुप्ता हिच्या हनीट्रॅपमध्ये अडकून बेबी बेबी म्हणत कुरूलकर याने अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला दिली होती. आता केवळ एवढच नाही तर डीआरडीओशी संबंधित कंत्राट देण्यासाठी दोन महिलांवर अत्याचार केल्याची ही धक्कादायक बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.
दोन्ही पीडित महिलांना डीआरडीओच्या कामाचे टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा ही तपास होण आवश्यक आहे. पीडित महिला या भारतीय महिला असून या महिलांना मध्ये वेगवेगळे टेंडर देतो म्हणून कुरुलकर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून कार्यालयातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आरोपपत्रात नमूद आहे.कुरूलकर प्रकरणात एटीएसने दीड हजार पानांच आरोपपत्र आठ दिवसांपूर्वीच दाखल केलं आहे, आता या आरोपपत्रातून एकएक धक्कादायक खुलासे होत आहेत.
अग्नी-6, मिसाइल लॉन्चर ते ब्रम्होस, कुरूलकर-झाराच्या व्हॉट्सऍप चॅटने खळबळ!
डॉ. कुरुलकरला झारा हिने ती युकेमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची ओळख सांगितली होती. त्यानंतर अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये डॉ. कुरुलकर याने झाराचा मोबाईल ब्लॉक केला होता. तिने अनोळखी क्रमांकावरून माझा मोबाईल ब्लॉक का केला, असा प्रश्न डॉ. कुरुलकर याला विचारला, असे आरोपपत्रात नमूद आहे.
डॉ. कुरुलकरने चॅटिंगद्वारे झाराला काय माहिती दिली :
– एसएएमची टेस्ट झाली आणि ती हवार्इ व सैन्य दलाला देणार
– ड्रोनद्वारे घेण्यात आलेले फोटो पाठवले
– ड्रोनच्या टेस्टींगचे व्हीडीओ पाठवले
– कोणत्या देशांनी एके सिस्टम मागवली
– फिलीपीनने ब्रह्मोसच्या ऑर्डरमध्ये वाढ केली
– अग्नी 6 मी डिझार्इन केले आहे
अग्नी 6 बाबत झालेले चॅटिंग :
झारा : अग्नी 6 चे काम कसे सुरू आहे, त्याची टेस्ट कधी होणार?
डॉ. कुरुलकर : नार्इट फायर करणार, थोडा धीर धर
झारा : अग्नी 6 कुठे जाणार सैन्य की हवार्इदल?
डॉ. कुरुलकर : दोन्हीकडे
झारा दासगुप्ता आणि डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यातील चॅटिंग :
झारा : ब्रह्मोससाठी किती व्हर्जन मॉडिफाईड केली गेली?
डॉ. कुरुलकर : मला वाटते खूप आहे. बरीचशी उपकरणे माझ्या आस्थापनेत असतील.
झारा : बेब, डिझाईन रिपोर्ट म्हणजे तुझ्या मते कसा असेल?
डॉ. कुरुलकर : बेब, याची तुला कॉपी व्हॉटस्अप किंवा मेल करू शकत नाही. हे खूप संवेदनशील आहे. मी ती मिळवितो आणि तयार ठेवतो. तू इथे आल्यावर ती दाखवतो’.