• Wed. Aug 6th, 2025

मध्य प्रदेशात भीषण अपघात! बसने दिलेल्या धडकेत महाराष्ट्रातील ११ कामगार ठार; गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले मृतदेह

Byjantaadmin

Nov 4, 2022

मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. अपघातानंतर सात मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आले.

एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *