• Thu. Jun 26th, 2025

ताईला वाढदिवसाला दिले चक्क अडीच किलो टोमॅटो गिफ्ट, चर्चा तर होणारच!

Byjantaadmin

Jul 10, 2023

कल्याण,: गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटोचे दर हे चांगलेच महाग झालेत. या महागाईमुळे सामन्यांचं बजेट कोलमडलंय. फक्त स्वयंपाकघरच नाही तर अनेक हॉटेलमधूनही हे टोमॅटो गायब झालेत.  एका भावानं त्याच्या बहिणीला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून टोमॅटो दिले आहेत. त्यामुळे या वाढदिवसाची सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.

कुणी दिलं गिफ्ट?

कल्याणमध्ये राहणाऱ्या सोनल बोरसे हीचा वाढदिवस होता . यावेळी त्यांनी आपल्या भावाला वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते.  बहिणीला काय गिफ्ट द्यावे या विचारत असताना गौतम यांना बहिणीला रोज स्वयंपाकात टोमॅटो लागतो. त्याशिवाय तिला जेवण बनवल्यासारखे वाटत नाही हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सध्या महाग झालेले टोमॅटो बहिणीला गिफ्ट द्यायचं ठरवलं. टोमॅटो गिफ्ट देण्याची त्याची कल्पना त्यांनी सोनलच्या मावशी आणि मामानाही सांगितली. ही कल्पना सर्वानाच आवडल्याने भाऊ गौतम आणि सर्व नातेवाईकांनी सोनलला तीन ते साडे तीन किलो टोमॅटो गिफ्ट म्हणून दिले. यामधील अडीच किलो टोमॅटो हे गौतमनं दिले आहेत.सध्या मार्केटमधून गायब झालेले टोमॅटो घरी आल्याने सोनलला अतिशय आनंद झाला. वाढदिवसानिमित्त सगळ्यात हटके आणि महगगडे गिफ्ट मला मिळालंय व सगळ्यात महाग गिफ्ट मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भावाने व नातेवाईकांनी टोमॅटो गिफ्ट दिल्याची बातमी पूर्ण शहरात पसरल्याने तिचा वाढदिवस हा चर्चेचा विषय बनला.

का वाढले भाव?

महाराष्ट्रातील नाशिक, जुन्नर, पुणे येथून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होते.  यावेळी अवकाळी पाऊस, त्यानंतर पुन्हा उन्ह आणि पुन्हा पाऊस त्यातच बिपरजॉय वादळ या सगळ्या निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.  किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोची आयात कमी झालीय. या सर्वांचा परिणाम टोमॅटोचे दर वाढण्यात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *