• Thu. Jun 26th, 2025

रेणा कारखान्याचे ऊस उत्पादक ‘ज्ञानयाग’ अभ्यास दौ-यावर 

Byjantaadmin

Jul 10, 2023
रेणा कारखान्याचे ऊस उत्पादक ‘ज्ञानयाग’ अभ्यास दौ-यावर
रेणापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्रात ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीबाबत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे आणि त्याचा वापर प्रत्यक्ष शेतीमध्ये होणे ही काळाची गरज असल्याने वसंतदादा साखर संस्थेतर्फे ऊस उत्पादक शेतक-यासाठी दि.११/०७/२०२३ ते १४/०७/२०२३ च्या दरम्यान ‘ऊस शेती ज्ञानयाग’ रहिवाशी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सदरील प्रशिक्षणाचा आपले कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांना उपयोग व्हावा. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील ३० ऊस उत्पादकांना प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेण्यासाठी पाठवत असून आणि यापुढेही प्रशिक्षण शिबीरास आपले ऊस उत्पादकांना पाठविण्याचा प्रयत्न केला जाईल. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने उसाचे उत्पादन व साखर उतारा वाढीसाठी जमीनीची निवड, सेंद्रीय तसेच हिरवळींचे खतांचा वापर योग्य ऊस जातीची निवड, मजुर कमतरतेचा विचार करुन दोन ओळीतील व रोपांतील अंतर रासायनीक खत व्यवस्थापन, ठीबक संचाचा वापर करुन पाण्याची बचत व संचाची देखभाल, रोग कीड व्यवस्थापन अशा सर्व विषयांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती देवून याचा प्रशिक्षणामध्ये सहभाग घेणा-या ऊस उत्पादक शेतक-यांनी त्यांना प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या ऊस शेतीमध्ये उपयोग करावा व इतर सभासदांना त्याबाबत मार्गदर्शन करावे असे अवाहन केले. वसंतदादा साखर संस्थेतर्फे ऊस उत्पादक शेतक-यासाठी आयोजीत केलेल्या ‘ऊस शेती ज्ञानयाग’ रहिवाशी प्रशिक्षण कार्यक्रमास रेणा कारखान्याचे वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील ३० ऊस उत्पादक सभासदांना पाठविले असून सदरील शिबीर दौ-यास कारखान्याचे चेअरमन श्री. सर्जेराव मोरे , व्हा. चेअरमन तथा अध्यक्ष ऊस विकास समिती श्री. अनंतराव देशमुख  व माजी चेअरमन तथा संचालक श्री. यशवंतराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. धनराज देशमुख, श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, श्री संजय हरीदास, श्री. संग्राम माटेकर, श्री. अनिल कुटवाड, श्री. स्नेहल देशमुख, तसेच कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. एस. एस. भोसले ऊस विकास अधिकारी श्री. एस. डी. जाधव व शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *