लोकनेते विलासराव देशमुख यांच्याप्रमाणे दिलीपराव देशमुख यांनीही महाराष्ट्र पादांक्रांत करावे -जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे प्रतिपादन
सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मानवसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना प्रदान
लातूर :-आजच्या राजकारणात मला काही मिळाले तर निष्ठा नाही तर निसटा अशी अवस्था झाली असून माणसाची उंची पदावर नव्हे तर नैतिकता व चारित्र्यावर निश्चित होत असते असे सांगून जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्पष्ट करून मनावर ताबा असणारा माणूस अध्यात्मवादी असतो आजच्या परिस्थितीत कर्तबगारी व चारित्राचा दुष्काळ पडल्याचे चित्र दिसत असून राज्यात वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सारखी माणसं आता फिरताना दिसत नाही अशी खंत व्यक्त करून लोकनेते विलासराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने राज्यभर फिरले त्याच पद्धतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आता राज्यात पादाक्रांत करावे अशी अपेक्षा जेष्ठ विचारवंत पत्रकार मधुकर भावे यांनी येथे बोलताना व्यक्त केले
लातूर येथे सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती पंढरपूरचे अध्यक्ष सद्गुरु ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते रविवारी 9 जुलै रोजी लातूर शहरातील दयानंद सभागृह येथे मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुरधाळ तालुका देवनी जिल्हा लातूरच्या वतीने मानवसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी अध्यक्षपदावरून मधुकर भावे बोलत होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार थोर विचारवंत माजी संपादक मधुकर भावे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख सौ गौरवीताई अतूलजी भोसले (देशमुख) हौशाबाई वेंकटराव घोगरे पाटील, मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुरदाळ तालुका देवणी जिल्हा लातूरच्या अध्यक्षा सरोजा घोगरे पाटील सचिव वसंतराव घोगरे पाटील, माजी आमदार त्र्यंबक भिसे , श्रीशैल्य उटगे लक्ष्मणराव मोरे आबासाहेब पाटील सर्जेराव मोरे अँड प्रमोद जाधव, रवींद्र काळे, विजय देशमुख गणपतराव बाजुळगे, पृथ्वीराज शिरसाठ अँड किरण जाधव उदयसिंह देशमुख हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, बाळासाहेब पाटील, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
दिलीपराव देशमुख यांचे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य-आमदार अमीत देशमुख यांचे प्रतिपादन
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा मानवसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना मिळाला याचा मला मनस्वी आनंद आहे आदरणीय काका सारखी माणसे अलीकडे क्वचितच आढळतात त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे अलीकडे एका विचाराशी एकनिष्ठ राहणारे कमी आहेत दगडोजीराव देशमुख लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जे सहवासात आले त्यांनी लातूरची संस्कृती व लातूरचा ठेवा जपला आहे स्वातंत्र्यापूर्वीपासून जो विचार लातुरात रुजला आहे त्याचा आज खऱ्या अर्थाने येथे गौरव होत आहे असे सांगुन ते म्हणाले की आज महाराष्ट्र सर्व ऐकतोय पाहतोय आणि 2024 च्या निवडणुकीत तो निर्णय घेईल लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे नाते राम लक्ष्मणासारखे आदर्श आहे महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक काका पुतण्यांचे किस्से पाहिलेले आहेत जे संस्कार वाढवडिलांनी केले ते जोपासण्याचे काम पुढाकार घेऊन आदरणीय काकांनी केले लोकनेते विलासराव देशमुख यांनी देशभर राज्यभर आपले कार्य केले तर आपलं घर आपला जिल्हा सांभाळण्याचे काम काकांनी केले आज लोकनेते विलासराव देशमुख यांचे काम कार्य विचार टिकून ठेवण्याचे काम काकांनी केले असे सांगून त्यांनी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना शुभेच्छा दिल्या
कर्तव्य म्हणून अनेक क्षेत्रात कार्य केले-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मनोगत
जीवनात बांधीलकी व तत्व कठीण नसून ते आपल्या हातात असून आपणही सामाजिक बांधिलकी म्हणून अधिकार पेक्षा कर्तव्य म्हणून अधिक कार्य केले आजचा मिळालेला मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार लोकनेते विलासराव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना अर्पण करतो असे त्यांनी सांगीतले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव वसंतराव घोगरे पाटील यांनी केले यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे सद्गुरु ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प बाळकृष्ण काळे महाराज यांनी केले.