माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सुप्रसिद्ध डॉ. कल्याण बरमदे यांच्या निवासस्थानी दिली भेट विविध विषयावर केली चर्चा
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील आदर्श कॉलनी येथील लातूर आयएमएचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉ.कल्याण बरमदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवी काळे, डॉ.मनीषा कल्याण बरमदे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, डॉ. अजय जाधव, डॉ.अशोक पोतदार, डॉ.चेतन सारडा, डॉ.आनंद पाटील, डॉ.अशोक आरदवाड, डॉ. संदीपान साबदे, डॉ. पोळ डॉ.शिवपुजे, डॉ.देशमुख, डॉ.राजू दाताळ, डॉ.वर्धमान उदगीरकर, आदीसह लातूर आयएमएचे पदाधिकारी बरमदे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.