• Tue. Apr 29th, 2025

जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा-माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Nov 4, 2022

जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना
पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा-माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख

*लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहून मांडले विविध प्रश्न

*लातूर जिल्हा शासकीय रुग्णालय उभारण्याकरिता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेली
* कृषी महाविद्यालयाची जागा त्वरित हस्तांतरित करावी .
*लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय ईमारत व नियोजन भवन बांधकामाच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी

*लातूर शहरातील जुनी शासकीय गोदामे महानगरपालिकेच्या जागेमध्ये हस्तांतरित करुन जुन्या धान्य गोदामाची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी.

*लातूर शहराबाहेरुन जाणारा नवीन बाह्रवळण रस्त्याच्या (६१.८० कि.मी.) बांधकामास आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्या निधीमधून मंजुरी द्यावी
*लातूर शहरातील पटेल चौक येथे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाच्या वतीने उभारावाच्या
* स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र आणि बालरोगशास्त्र विभाग तसेच १८९ खाटांचे नवीन रुग्णालय ईमारत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी

लातूर( प्रतिनिधी ):;जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, प्रस्तावित असलेल्या योजना व प्रकल्पांना राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून देऊन जिल्ह्याच्या विकासाची गती कायम ठेवावी अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहून केली. तसेच यावेळी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण ग्रामविकास व पंचायतराज क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशमहाजन यांच्याकडे लातूर जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विधानपरिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळे,आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील,  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी माजी राज्यमंत्री, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ अभ्यासू नेते भाई किसनराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले त्यांना उपस्थित मान्यवरांनी व सभागृहाने दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या बैठकी दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रेरणेतून युनोचे (UNO) 2030 पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करण्याऱ्या लातूर जिल्ह्याच्या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी  लातूर जिल्हा शासकीय रुग्णालय उभारण्याकरिता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेली कृषी महाविद्यालयाची जागा त्वरित हस्तांतरित करावी, लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय ईमारत व नियोजन भवन बांधकामाच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी, महाराष्ट्रातील ९ ते १५ या वयोगटातील मुली व १६ ते ४५ या वयोगटातील महिला यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सव्र्हावॅक ही ह्रुमन पॅपिलोमा व्हायरस (एच.पी.व्ही.) लस मोफत उपलब्ध करुन  द्यावी, लातूर शहरातील जुनी शासकीय गोदामे महानगरपालिकेच्या जागेमध्ये हस्तांतरित करुन जुन्या धान्य गोदामाची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, लातूर शहराबाहेरुन जाणारा नवीन बाह्रवळण रस्त्याच्या (६१.८० कि.मी.) बांधकामास आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्या निधीमधून मंजुरी द्यावी, लातूर शहरातील पटेल चौक येथे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाच्या वतीने उभारावाच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र आणि बालरोगशास्त्र विभाग तसेच १८९ खाटांचे नवीन रुग्णालय ईमारत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, मौजे साई ता.जि.लातूर येथील लातूर महानगरपालिका मालकीच्या जागेवर पर्यटन स्थळाचा नियोजनबध्द विकास करण्यासाठीच्या प्रस्तावास निधी उपलब्ध करुन द्यावा, लातूर शहरातील भूमिगत केबल योजनेच्या कामाची केंद्र शासनाकडे शिफारस करून निधी उपलब्ध करून द्यावा, लातूर येथे युनानी, तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय उभारणी बाबतचे प्रस्ताव दाखल आहे त्यास मंजुरी मिळवून द्यावी, लातूर – बार्शी – कुर्डुवाडी – टेंभुर्णी या महामार्गाच्या कामाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाठपुरावा करावा, त्याचबरोबर ग्रामीण भागातील स्मशानभूमीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जमीन खरेदी करण्यासंदर्भात धोरणाची आखणी करावी, लातूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची काही रक्कम देणे बाकी आहे तीही शिवभोजन चालकांना राज्य सरकारने द्यावी आदी मागण्या यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने लवकरच नवीन स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी लवकरच धोरण जाहीर करू असे सांगून अन्य मागण्याना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या सर्व मागणी बाबत विचार करण्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed