पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी घेतली भेट,विविध विषयावर केली चर्चा
लातूर प्रतिनिधी :राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची आज गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी लातूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी बी.पी पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, माजी आमदार विनायकराव पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, समद पटेल, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.