• Thu. Jun 26th, 2025

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने अंबुलगा बु. स्मशानभूमित वृक्ष लागवड

Byjantaadmin

Jul 9, 2023
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने अंबुलगा बु. स्मशानभूमित वृक्ष लागवड
डॉ नारायण नागमोडे यांच्या वतीने दोनशे वृक्ष भेट
निलंगा/प्रतिनिधी  ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने अंबुलगा बु येथील स्मशानभूमित शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली असून सरपंच स्वाती शिंदे व उपसरपंच यांचा या सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग होता…निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील स्मशानभूमित ग्रीन लातूर टीमच्या वतीने व सरपंच स्वाती शिंदे,उपसरपंच जगदिश सगर यांच्या प्रमुख पुढाकारातून दिनांक १० रोजी दोनशे वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.सकाळी ७ वाजता झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक उपक्रमाला  सुरवात करण्यात आली.ग्रीन लातूर टीम सलग १५०० दिवस लातूर जिल्ह्यात झाडे लावत असून अंबुलगा बु येथे  एक  दिवस निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु  येथील स्मशाभूमीत दोनशे  झाडे लावत साजरा केला यावेळी डॉ.नारायण नागमोडे यांच्या वतीने  ग्रीन वृक्ष टीमला रोपे भेट देऊन स्वागत केले.
ग्रीन लातूर टीमचे डॉ.नारायण नागमोडे डॉ.पवन लड्डा,पद्माकर बागल,राहुल माने ,अरविंद फड ,दयाराम सुडे ,ऍड.वैशालीताई यादव लोंढे बालाजी उमरदंड ,मुकेश लाटे ,सिताराम कंजे आकाश सावंत,ओमकार ,पांडुरंग बोडके ,हर्षदा बाचेपल्लीकर,पूजा पाटील ,वेदुला राजमाने,दिपाली राजपूत ,मोईज मिर्झा भराटे सर्व प्रमुख सदस्य या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते.अंबुलगा बु गावचे भूमिपुञ लातूर येथील बालरोग तज्ञ स्पर्श हाॕस्पीटलचे मुख्य संचालक  डॉ नारायण नागमोडे यांच्या वतीने स्वखर्चाने दोनशे वृक्ष भेट  देण्यात आले असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी गावचे सरपंच स्वाती शिंदे,उपसरपंच जगदिश सगर,ग्रा.प.सदस्य महावीर काकडे,अनुसया काळे,जि.प.शाळेचे मुख्याद्यापक शिवशंकर मिरगाळे,गंगाराम सुर्यवंशी,संतराम बिरादार,अशीष पाटील,ग्रामसेवक शिवाजी मोरे,नंदकुमार सुर्यवंशी,शिवाजी शिंदे,आनंद सागावे,शाम सगर,गणेश बिरादार,चंद्रकांत होरे,भागवत म्हेञे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *