माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
घेतल्या नागरिकांच्या भेटीगाठी निवेदने स्वीकारत
संबंधितांना केल्या आवश्यक सूचना
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि.८ जुलै २०२३ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला, यासोबतच
संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचनाही केल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे
चेअरमन गणपतराव बाजूळगे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, उपसभापती सुनील पडिले,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे, व्हा. चेअरमन श्याम भोसले, सचिन दाताळ, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रितीताई भोसले, पत्रकार राम जेवरे, हरी तूगावकर, रघुनाथ बनसोडे, डॉ. अरविंद भातांब्रे, सोनू
डगवाले, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बालाप्रसाद बिदादा, बालाजी वाघमारे, माजी नगरसेवक राजकुमार जाधव, प्रवीण सूर्यवंशी,व्यंकटेश पुरी, सुपर्ण जगताप, माजी नगरसेवक युनूस मोमीन, सचिन बंडापले,
प्रा.प्रवीण कांबळे, शरद देशमुख, संचालक प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, सचिन पाटील, अनिल चव्हाण, हनमंत पवार, रमेश थोरमोठे पाटील, सुबुद्दीन शेख, राजाभाऊ मोरे, सिद्राम कटारे, रघुनाथ शिंदे, माधव गंभीरे, गोपाळ बुरबुरे, विकास कांबळे, विजय टाकेकर, सत्यवान कांबळे, आदींसह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
—————–