• Fri. Feb 6th, 2026

महाराष्ट्र विद्यालय, औराद (शहा.) येथे फिल्टर वॉटर मशीनचे सोमय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

Byjantaadmin

Jul 8, 2023

महाराष्ट्र विद्यालय, औराद (शहा.) येथे फिल्टर वॉटर मशीन चे सोमय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

औराद शा.(प्रतिनिधी):-महाराष्ट्र विद्यालय, औराद (शहा.) येथे “पाणी शुद्धीकरण (फिल्टर वॉटर) मशीन” चे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून सोमय मुंडे (पोलीस अधीक्षक, लातूर जिल्हा) लाभले होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नितीन कटेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा) यांची उपस्थिती होती.
यावेळी आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख सोमय मुंडे (जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर) यांचे स्वागत शारदोपासक शिक्षण संस्थेचे सहसचिव राजेश वलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. नितीन कटेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा) यांचे स्वागत शारदोपासक शिक्षण संस्थेचे संचालक शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधिक स्वरूपात कु. पाटील आकांक्षा यांच्या हस्ते सोमय मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. व कु. येणगे यशोदा यांच्या हस्ते डॉ. नितीन कटेकर यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक वसंतराव पाटील यांच्या हस्ते प्रमुख उद्घाटक सोमय मुंडे (जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर) यांचे स्वागत करण्यात आले.
शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ फोडून पाणी शुद्धीकरण मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बस्वराज वलांडे , सहसचिव राजेशजी वलांडे साहेब, संस्थेचे संचालक शिवाजीराव जाधव सर, . मठपती सर, गिरबने सर, अनिल डोईजोडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक वसंतराव पाटील सर, उपमुख्याध्यापक जाधव सर, शाळेचे पर्यवेक्षक गोपणे सर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *