भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी मार्केट यार्डच्या अध्यक्षपदी नितीन कोरे
लातूर : लातूर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या शिवछत्रपती मार्केट यार्ड पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. आघाडीच्या अध्यक्षपदी नितीन बाबासाहेब कोरे यांची तर सचिवपदी हेमंत पाटील मसलगेकर यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा हा कार्यक्रम हॉटेल गंधर्वच्या सभागृहात पार पडला. यावेळी लातूर शहर भाजप जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, लातूर शहर भाजप संघटन सरचिटणीस एड. दिग्विजय काथवटे, भाजयुमोचे लातूर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, लातूर शहर भाजप सरचिटणीस प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी यांसह दिनकर पाटील मसलगेकर, नरेश पंड्या, गोवर्धन भंडारी, नंदकिशोर सोनी, शरद शर्मा, विकास देशपांडे, अजय दुडीले, दत्तात्रय गंभीरे, आनंद अंकलकोटे, भालचंद्र दानाई, विनोद भुतडा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी शिवछत्रपती मार्केट यार्डच्या अध्यक्षपदी नितीन बाबासाहेब कोरे यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी असे आहेत : उपाध्यक्ष – चंद्रवर्धन खंदाडे, उपाध्यक्ष – पांडुरंग बेडदे, सचिव – हेमंत पाटील मसलगेकर, सहसचिव – अमोल चलवाड, कोषाध्यक्ष – पुरुषोत्तम बजाज, प्रसिद्धी पमुख व सोशल मिडिया हेड संजय केंद्रे, सदस्य – संतोष हेड्डा, अशोक तापडिया, योगेश गंभीरे ,अमोल पाटील शिवणीकर , पुनीत बलदवा, दिलीप आवस्कर, राचाप्पा भरमाजे, विकास पवार, जगदीश मलंग, मनन शहा,ज्ञानेश्वर जाधव, ऋषिकेश भोसले. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.