• Fri. Jun 27th, 2025

लातूर लोकसभेसाठी बसपाची मोर्चेबांधणी ;लोकसभा निवडणूक पूर्ण ताकद पणाला लावून लढवणार-जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ आल्टे

Byjantaadmin

Jul 6, 2023
लातूर लोकसभेसाठी बसपाची मोर्चेबांधणी
बहन मायावतींना पंतप्रधान बनवण्यासाठी बसपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे
– जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ आल्टे यांचे आवाहन
लातूर –  देशाची सध्याची परिस्थिती पाहता संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात बहन मायावती पंतप्रधान बनल्या पाहिजेत. त्यासाटी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी लातूर जिल्ह्यात बहुजन समाज पार्टी आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक पूर्ण ताकद पणाला लावून लढवणार आहोत. त्यासाठी बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ आल्टे यांनी येथे केले आहे.
बहुजन समाज पार्टीची लातूर जिल्हा समीक्षा बैठक शहरातील पत्रकार भवन येथे पार पडली. त्यावेळी प्रा. विश्‍वनाथ आल्टे हे बोलत होते. या महत्वपूर्ण बैठकी लातूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बसपाचे प्रदेश प्रभारी मनीष आनंद, प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश प्रभारी मनीष कावळे, प्रदेश सचिव, व्यंकट बरगे प्रा. , संजय वाघमारे, तान्हाजी गायकवाड, अनित्य कांबळे,अनिल कांबळे,जिल्हा प्रभारी उदय सोनवणे, सिद्धार्थ सूर्यवंशी ऍड रमेश गायकवाड, बालाजी शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बसपा सुप्रीमो बहन मायावती यांना पंतप्रधान बनवण्यासाठीच आपण लातूर जिल्हाध्यक्षपदाची धूरा सांभाळली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकद लावून बसपा उमेदवार निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बसपा जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ आल्टे यांनी यावेळी सांगितले.
2024 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये भारताचे संविधान वाचवायचे असेल तर  भाजपाला आणि नरेंद्र मोदीला पर्याय म्हणून बहन मायावतीच असू शकतात. यापुढे वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा असे  बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी उपस्थित प्रदेश प्रभारी मनीष आनंद, मनीष कावळे, प्रदेश सचिव व्यंकट बरगे, प्रा. अनिल कांबळे, संजय वाघमारे, दिंगबर ढोले, तानाजी गायकवाड, अनित्य कांबळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपवर विचार मांडले.
बैठकीचे प्रास्ताविक उदय सोनवणे यानी केले तर सुत्रसंचलन उदगीर विधानसभा व जिल्हा उपाध्यक्ष डी. एल. अंबेगावे यांनी केले. तसेच अ शंकर जाधव यांनी आभार मांनले यावेळी अरविंद दामावले, ज्योतीराम लामतुरे, गौतम बनसोडे, भोजराज खंडेराव, रमेश गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, महेंद्र जोगदंड, रोहित शृंगारे, सूर्योदय सोनवणे, प्रथमेश आल्टे, सचिव गौतम सोनवणे, श्रीधर शेवाळे, अशीतोष ओव्हाळ, सुजित सूर्यवंशी, सुभाष सुर्यवंशी, राजाराम कांबळे, पंचशीला रणदिवे, प्रीती चितोले यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *