• Fri. Jun 27th, 2025

जागतिक सीए दिनानिमित्त विविध उपक्रम 

Byjantaadmin

Jul 6, 2023
जागतिक सीए दिनानिमित्त विविध उपक्रम
    लातूर/प्रतिनिधी:दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने ७५ वा जागतिक सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
   सीए दिनानिमित्त झेंडावंदन,वॉकेथॉन व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यात शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील सीए व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मुलांसाठी बॉक्स क्रिकेट,तर मुलींसाठी कॅरम,
बॅडमिंटन व बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या.सीए दिन व डॉक्टर्स डे निमित्त संयुक्त कार्यक्रमही घेण्यात आला.खा.सुधाकरराव शृंगारे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
    हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी लातूर शाखेचे अध्यक्ष सीए विश्वास जाधव,उपाध्यक्ष सीए राहुल धरणे,सचिव सीए महेश तोष्णीवाल, कोषाध्यक्ष सीए निलेश बजाज,विद्यार्थी संघटना सीए एकनाथ धर्माधिकारी,सदस्य द्वारकादास भुतडा व कर्मचारी सुमित ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *