• Sat. Jun 28th, 2025

भाजप मित्रपक्ष अण्णा द्रमुकचा समान नागरी कायद्याला विरोध

Byjantaadmin

Jul 6, 2023

भाजपचा मित्रपक्ष तामिळनाडूतील अण्णा द्रमुकनेही बुधवारी समान नागरी कायद्यास विरोध केला. अण्णा द्रमुकचे अध्यक्ष पलानीस्वामी म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाच्या जाहीरनाम्यात आधीच परिस्थिती स्पष्ट केली होती.

 

अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारांवर विपरीत परिणाम करणाऱ्या समान नागरी कायद्यासाठी घटनेत कोणतीही दुरुस्ती करू नये, अशी विनंती आमचा पक्ष मोदी सरकारला विनंती करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत पलानीस्वामी यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. सध्या तरी कोणतीही निवडणूक नाही. आम्ही कोणत्या पक्षांशी युती करतो हे निवडणुकीच्या वेळी नक्कीच सांगू,असे ते म्हणाले.

दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही समान नागरी कायद्याबाबत बोर्डाने आपले तीव्र आक्षेप विधी आयोगाकडे नोंदवलेे आहेत आणि केवळ आदिवासीच नाही तर प्रत्येक धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्याची मागणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *