अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे आता शिंदे गट चांगलाच नाराज झाला आहे. त्यांनी आज सायंकाळी मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीआधी मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या विधानामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.मंत्रीशंभूराज देसाई म्हणाले, जर उद्धव ठाकरेंनी साद दिली तर सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे सूचक विधान शंभूराज देसाई यांनी साम टिव्हीशी बोलताना केले आहे. देसाई यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
यामुळे शिवसेना शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.दरम्यान, या विधानावर बोलताना देसाई म्हणाले, माध्यमांच्या प्रतिनिधींनी मला विचारले उद्धव ठाकरें गटाकडून काही प्रस्तावर आता तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देणार का? यावर मी असे बोललो की, कुणी साद घातली तर प्रतिसाद देऊ, असे मी नॉरमली बोललो होतो. अद्याप तरी आम्हाला तसा प्रस्तावर आला नाही. त्यामुळे जर अशी साद ठाकरे गटाकडून दिला तर प्रतिसाद नक्की देऊ.नेहमीची ही राजकारणातील पद्धत आहे. जर कुणी आपल्याला सकारात्मक साद घातली तर तो प्रस्ताव आपण लगेच नाकारत नाही. त्यावर विचार करु असे म्हणतो. म्हणून मी असे म्हटले आहे. पण विचार करणारा मी एकटा नाही. आमचे नेते आहेत. तुम्ही जर तर विचारले म्हणून मी त्याला जर तरचे उत्तर दिले. पण तसा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी नको असे आम्ही म्हटले होते. आपण आपल्या मित्रपक्षाला भाजपाला साद देऊया, असे आम्ही म्हटले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी मी म्हणालो होतो की, आता आम्हाला उद्धव ठाकरे यांनी आशिर्वाद द्यावा, त्यावेळी पण मी म्हटले होते, झाले ते झाले दोन अडीच वर्ष त्यामुळे मी म्हणालो होतो, आमच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी आशिर्वाद द्यावा, असे देसाई यांनी सांगितले.