• Sun. Jun 29th, 2025

एका आठवड्यात पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, कुणाला मिळणार संधी?

Byjantaadmin

Jul 4, 2023

पुढील आठवड्यात पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असताना आता आणखी एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तसेच अन्य ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता पुढील आठवड्यात पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडून २ जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर शिंदे गटात खळबळ माजल्याचं बोललं जात होतं. मात्र आता मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार असून त्यामध्ये इच्छुकांना संधी दिली जाणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होईल. यात शिवसेना व भाजपमधील इच्छुक आमदारांना संधी दिली जाईल. त्याचबरोबर एक आठवड्याच्या आत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असंही शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, रविवारी अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे. अजित पवार यांनी दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद नको पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी १ जुलै पर्यंत अल्टीमेटम दिला होता. मात्र शरद पवारांनी त्यांची मागणी मान्य केली नसल्यानं त्यांनी बंडखोरी करत शिंदे सरकारला समर्थन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *