• Sun. Jun 29th, 2025

लातूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ईश्वर बाहेती सचिव नागेश स्वामी तर कोषाध्यक्ष राजकुमार राजारुपे 

Byjantaadmin

Jul 4, 2023
लातूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ईश्वर बाहेती सचिव नागेश स्वामी तर कोषाध्यक्ष राजकुमार राजारुपे
 लातूर – येथील लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ईश्वर बाहेती यांची तर सचिवपदी नागेश स्वामी व कोषाध्यक्ष पदी राजकुमार राजारुपे यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली.
 लातूर तालुका केमीस्ट अँन्ड ड्रगीष्ट असोसिएशनच्या पदाधिकारी निवडीची बैठक जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरिक्षक  अनिल स्वामी व ओम बाहेती यांच्या  उपस्थितीत रविवारी दि.२ रोजी डॉ.भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ केमिस्ट मधुसूदन झंवर,सचिन देशपांडे उपस्थित होते.यावेळी लातूर तालुका केमीस्ट अँन्ड ड्रगीष्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवड करण्यात आली.यावेळी सर्वानुमते पुर्विचे अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव नागेश स्वामी व कोषाध्यक्ष राजकुमार राजारुपे यांची फेरनिवड करण्यात आली.तर उर्वरीत कार्यकारिणी पुढील प्रमाणे करण्यात आली.यात उपाध्यक्ष अरविंद औरादे,मनोज आगाशे,रवींद्र दरक सहसचिव उमाकांत पाटील,सतीश भुतडा,विजय बेल्लाळे, सहकोषाध्यक्ष रुपेश कोटलवार, हेमंत मुळे , पी आर ओ प्रवीण कोटलवार, समन्वयक आप्पासाहेब घोगरे, संघटन सचिव अनिल जवादवार, प्रसिद्धीप्रमुख सुनील स्वामी, कार्यकारिणी सदस्य सुजित शिंदे, धनाजी तोडकर,प्रशांत फड,बालाजी मुसळे, संगमेश्वर स्वामी, शरद कोराळे, कपिल आवाळे, महेश कोंडेवार,अमोल तट ,सुमित पंडगे ,विकास गायकवाड, विलास कल्याणकर ,सुखानंद शेटकर ,रुपेश गंजेवार , इक्बाल इनामदार, विनोद उदगीरकर, राहुल चापसी , नंदकिशोर जाधव पाटील, नंदकिशोर बाहेती यांची निवड करण्यात आली.यावेळी नुतन अध्यक्ष ईश्वर बाहेती व सचिव नागेश स्वामी यांनी सर्व केमिस्ट बांधवाच्या कोणत्याही अडीअडचणी समजून घेवुन मार्गी लावणार असल्याचा मानस व्यक्त केला.यावेळी  केमिस्ट अँड ड्रगीष्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रामदास भोसले यांनी नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून संघटनेचे ध्येय धोरण सांगितले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कोषाध्यक्ष राजकुमार राजारुपे यांनी केले.यावेळी लातूर शहर व तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *