निलंग्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंदउत्साह साजरा
निलंगा:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 8 सहकारी आमदार मंत्री
म्हणून सरकारमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हर्षउल्हासमध्ये
फटाके फोडून ,पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ ,माजी नगरसेवक हसन चाऊस, विधानसभा अध्यक्ष सुधीर दादा मसलगे, युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, , जिल्हा उपाध्यक्ष महादेवी पाटील,अंगद जाधव एॅड मंगला पाटील ता.उपाध्यक्ष संगिता कदम, जिल्हा सरचिटणीस कोमलताई देशपांडे,
सेवादल शहराध्यक्ष इफरोज शेख,ओबीसी शहराध्यक्ष अशोक शिरवाटे,पांडुरंग देशमुख, निलेश गायकवाड, बलभीम टेंकाळे, अजय कांबळे, आकाश डोंगरे, मुन्ना सुरवसे, गौतम सुरवसे, पद्माकर ढेरे,जगन्नाथ गायकवाड, संदीप मोरखंडे, विनोद शेवाळे, मुस्ताक बागवान,यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.