• Mon. Jun 30th, 2025

राष्ट्रवादी फुटली! अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ

Byjantaadmin

Jul 2, 2023

कनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथ विधी सोहळा दुपारी अडीच वाजता सुरू झाला. सुरुवातीला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

राजभवनावर दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर शपथविधी सोहळा सुरू झाला. यावेळी राज्यपाल बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, तर इतर नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली.

Maharashtra Politics : ajit pawar deputy chief minister in eknath shinde led government

शरद पवारांच्या जवळचे नेते शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री

अजित पवार, उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ, मंत्री
दिलीप वळसे-पटेल, मंत्री
हसन मुश्रीफ, मंत्री
धनंजय मुंडे, मंत्री
धर्मरावबाबा आत्राम, मंत्री
आदिती तटकरे, मंत्री
संजय बनसोडे, मंत्री
अनिल पाटील, मंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षात तिसऱ्यांदा भूकंप

राज्यात अशा स्वरुपाचा राजकीय भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत पहाटे शपथ घेतली होती. त्यानंतर बहुमत सिद्ध न करता आल्याने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले होते. हे सरकार कार्यरत असतानाच शिवसेनेत बंड झालं आणि महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी 2022 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेला वर्ष पूर्ण होत नाही, तोच आता अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत भूकंप घडवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *