• Sat. Jun 21st, 2025

हरित क्रांती चे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती निलंगा येथे उत्साह मध्ये साजरी

Byjantaadmin

Jul 1, 2023

हरित क्रांती चे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती निलंगा येथे अति उत्साह मध्ये साजरी

निलंगा ;-  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती निलंगा येथे सर्वधर्मीय जयंती उत्सव समिती व बंजारा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजां चौकामध्ये साजरी करण्यात आली. या जयंती मध्ये दापका गावचे सर्वेसर्वा लाला पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा पोलीस स्टेशनचे श्री गोविंद राठोड यांच्या शुभहस्ते श्री प्रा. दयानंद चोपणे यांच्या अध्यक्षखाली स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना सर्व धर्मीय जयंती उत्सव समितीचे समन्वयक व प्रा. चोपणे म्हणाले की. स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी अत्यंत गरिबी हालाखीत जीवन जगले व त्यांनी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी घेतली. लहानपणापासूनच स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांना शेती विषयी आवड असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या व गोरगरीब जनतेला शेतीपासून लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री यांचा आदर्श समोर ठेवून यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या राज्यात प्रचंड पडलेल्या दुष्काळावर मात करून गोरगरिबांना अन्नधान्य पुरवून समाजामध्ये नाव राज्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे काम केले. रोजगार हमी योजनेची निर्मिती केली हा महाराष्ट्र कृषी प्रधान सुजलाम सुफलाम झाला पाहिजे व त्यांनी तो करून दाखवला याचबरोबर ते महाराष्ट्राचे सर्वात जास्त कार्यकाल असलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर नोंद केली जाते त्यांनी महाराष्ट्रामध्ये वीज रस्ते व सिंचनाची योजना जनसामान्यापर्यंत पोहोचण्याची काम केले माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब माझी मुख्यमंत्री यांनी हरित क्रांती दिन हा दिवस स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी पासून साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला कोण सामान्य माणसापर्यंतचीशेती असे ते म्हणाले यावेळी निलंगा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष श्री लाला पटेल मनाले की बंजारा समाज आधीपासूनच काँग्रेसच्या विचारसरणीशी जुळलेला असून या स्वर्गीय सुधाकररावजी नाईक व स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी बंजारा समाजासाठी अनेक योजना राज्यात व तालुक्यात राबवल्या त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी दापका गावातील सर्व बंजारा वस्तीमध्ये त्या योजना आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. बंजारा वस्तीमध्ये पुढील जयंती पर्यंत स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह बांधणार असे ते म्हणाले या कार्यक्रमाच्या वेळी निलंगा पोलीस स्टेशनचे श्री गोविंद राठोड यांनी आपले मत व्यक्त करताना मनाले की बंजारा समाज अत्यंत काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह भागवत असतो समाजातील सर्व बांधवांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा आदर्श समोर ठेवून उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाला बंजारा समाजातील सर्व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बाळासाहेब देशमुख धनराज जाधव बबलू शेळके खुर्चीचे गोपाळराव गायकवाड वाल्मीक चव्हाण राम जाधव राम जाधव रमेश चव्हाण रमेश जाधव उत्तम जाधव गोविंद जाधव अंबादास जाधव सेवालाल ग्रुप सर्व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *