घरणी प्रकल्पातून आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा होणार नाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचे आंदोलनकर्त्यांना वचन
निलंगा/प्रतिनिधी ः- शिरुर अनंतपाळ व चाकूर तालुक्यातील गांवांना पाणीपुरवठा करणार्या घरणी मध्यम प्रकल्पातून इतरत्र पाणीपुरवठा करण्यासाठी काम करण्यात येत आहे. संभाव्य उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन शिरुर अनंतपाळ व चाकूर तालुक्यातील शेतकर्यांसह नागरीकांनी आंदोलन सुरु केलेले आहे. मात्र घरणी प्रकल्पातून आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा होणार नाही असे वचन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कोणाच्या परवानगीने आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा करण्यासाठी काम सुरु केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना प्रशासनाला देऊन याबाबत शासनाकडेही मागणी केली असल्याचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पत्राद्वारे आंदोलनकर्त्यांना केले आहे.
चाकूर तालुक्यात असलेल्या घरणी मध्यम प्रकल्पातून आरक्षणाव्यतिरिक्त इतरत्र पाणीपुरवठा करण्यासाठी काम सुरु झाले आहे. त्यामुळे चाकूर व शिरुर अनंतपाळ तालुक्याला या प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असला तरी संभाव्य पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकल्पातून इतरत्र पाणीपुरवठा होऊ नये याकरीता शिरुर अनंतपाळ व चाकूर तालुक्यातील शेतकर्यांसह नागरीकांनी आंदोलन सुरु केले आहे. तसेच या आंदोलनाला योग्य दिशा देण्यासाठी स्व. डॉ. शिवाराजी पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गत पाच दिवसापासून वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांची जनभावना लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरक्षणाव्यतिरिक्त घरणी मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा होणार नाही असे वचन आंदोलनकर्त्यांना दिलेले आहे. विशेष म्हणजे या आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा होण्यासाठी जलसंपदा विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची बाबही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी आंदोलनकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळेच निलंगा विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलनकर्त्यांना मी वचन देत असल्याचे लेखी पत्राद्वारे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सांगितले आहे. तसेच भविष्यात असा प्रयत्न झाल्यास सर्वात प्रथम ते काम बंद करण्यासाठी आपण समोर येऊ अशी ग्वाही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी दिलेली आहे.
विशेष म्हणजे घरणी मध्यम प्रकल्पातून आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा करण्यासाठी ज्यांनी कोणी परवानगी दिली आहे किंवा ज्यांच्या परवानगीने हे काम सुरु झाले आहे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सुचनाही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर याबाबत शासनाकडेही मागणी केली असल्याचेही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या सर्व बाबीचा विचार करून घरणी मध्यम प्रकल्पातून आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा होऊ नये यासाठी जे आंदोलन चाकूर व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी नागरीकांसह स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीने सुरु केले आहे, ते मागे घ्यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पत्राद्वारे केले आहे.
घरणी प्रकल्पातून आरक्षणाव्यतिरिक्त पाणी उपसा होणार नाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचे आंदोलनकर्त्यांना वचन
