मुंबई : मुंबईतमध्ये सध्या पावसाची तूफान बॅटिंग सुरू आहे. गेल्या शनिवार पासून मुंबईमध्ये जोरदार पासूस सुरू आहे. आज देखील सकाळ पासून मुंबई आणि उपनगरमध्ये तूफान पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहेत. अनेक रस्त्यांना तलावाचे रूप आले आहे. याचा फटका वाहतुकीला बसला आहे. अनेक रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक संथ गतीने पुढे जात आहे. लोकल सेवा देखील यामुळे प्रभावित झाली आहे. अनेक ट्रॅकवर पाणी साठल्याने लोकल धीम्या गतीने पुढे जात आहे.
सकाळपासून मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूरपासून सायनपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली आहे. या कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने, थोडे अंतर कापण्यासाठी मोठा वेल लागत आहे. अंधेरी एसवी रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये तब्बल तीन ते चार फूट पाणी साठल्याने हा मार्ग नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. काही वेळाने हा मार्ग सुरू करण्यात आला आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. येथील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक भागात पाणी साचले आहे. वसई-विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे.