• Tue. Apr 29th, 2025

ठाकरेंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात; राहुल कनाल यांचा उद्या पक्षप्रवेश

Byjantaadmin

Jun 30, 2023

1 जुलै रोजी ठाकरे गट पालिकेविरोधात विराट मोर्चा काढणार आहे. पण त्याच दिवशी ठाकरेंना धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे  यांचे निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षाला जाहीर रित्या जय maharashtra करत असल्याचंही राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.

हुल कनाल यांनी ट्वीट केलंय की, “दुःख होतंय!!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही, ज्यांनी रात्रंदिवस काम केलंय. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अॅरोगन्स क्या होता है!!!”

राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed