• Wed. Apr 30th, 2025

सरकारी कार्यालयांना बकरी ईदची सुटी ‘या’ दिवशी मिळणार

Byjantaadmin

Jun 27, 2023

महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांना बकरी ईदची सार्वजनिक सुटी गुरुवार 29 जून 2023 रोजी मिळणार आहे. याआधी राज्य शासनाने सरकारी कार्यालयांना बकरी ईदची सुटी बुधवार 28 जून 2023 रोजी देणार असल्याचे जाहीर केले होते. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सुटीबाबतची नवी अधिसूचना जारी केली आहे. यंदा महाराष्ट्रात गुरुवार 29 जून 2023 रोजी बकरी ईद साजरी होणार आहे.

Maharashtra : सरकारी कार्यालयांना बकरी ईदची सुटी 'या' दिवशी मिळणार

 

letter
बकरी ईद का साजरी केली जाते?
मुस्लिमांचे दोन महत्त्वाचे सण आहेत. पहिला रमजान ईद किंवा रमझान ईद आणि दुसरा बकरी ईद किंवा बकरा ईद. याच सणाला ईद-उल-अधा किंवा बलिदानाची ईद किंवा त्यागाची ईद असेही म्हणतात. रमझान ईद नंतर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या दिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे.
इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम यांना 90 वर्षांचे असताना मुलगा झाला. पण अल्लाहने स्वप्नात येऊन हजरत इब्राहिम यांना त्यांच्या सर्वात प्रिय असलेल्या गोष्टीची कुर्बानी देण्यास सांगितले. अखेर हजरत इब्राहिम स्वतःच्या लाडक्या मुलाला कुर्बान करण्यासाठी घेऊन जात होते. प्रत्यक्ष कुर्बानी देताना त्रास होईल म्हणून त्यांनी स्वतःच्या डोळ्यांना कापडी पट्टी बांधली. यानंतर चमत्कार झाला. हजरत इब्राहिम यांनी धारदार शस्त्र वापरून कुर्बानी दिली आणि डोळ्यावरची पट्टी काढून बघितले तर मुलगा सुरक्षित होता पण एक बकरा मृतावस्थेत आढळला. हा चमत्कार अल्लाहने केला . या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी बकरी ईद साजरी केली जाते. कुर्बान केलेल्या बकऱ्याचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियांना किंवा गरजूंना देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. बकरी ईदनंतर एक महिन्याने मोहर्रम हा मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचा असलेला आणखी एक दिवस असतो 10 मोहर्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed