राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर…निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. खरंतर विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र आतापासूनचं इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कुणाला मिळणार हाच खरा प्रश्न आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…रूपाली चाकणकर…निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. खरं तर विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र आतापासूनचं इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. अलिकडच्या काळात पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकर अधिक सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी त्यांनी या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर पुणे महापालिका आयुक्तांची भेटली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं.खडकवासला विधानसभा मतदारसंघातून गेली तीन टर्म भाजपचे भीमराव तापकिर हे आमदार आहेत. गेल्याविधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं सचिन दोडके यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन – अडिच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता रूपाली चाकणकरांनी या विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.रूपाली चाकणकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती.पण स्वतः रूपाली चाकणकरांनी त्या चर्चेचं खंडन केलं होतं. आता त्यांनी खडकवासला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहिर केलंय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रूपाली चाकणकरांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार का? हाच खरा प्रश्न आहे. कारण 2019 नंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आता ठाकरेंच्या शिवसेनेची भर पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खडकवासल्याची जागा कुणाच्या वाट्याला जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथून चाकणकरांना उमेदवारी देणार का? हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.