• Wed. Apr 30th, 2025

1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या व्यहारांत मोठे बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Byjantaadmin

Jun 27, 2023

जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. आठवडाभरातनंतर जून महिना संपून जुलै महिना सुरू होत आहे. अशा परिस्थितीत दरमहिन्याप्रमाणे यावेळीही अनेक मोठे बदल होणार आहेत. एलपीजी सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर, सीएनजी-पीएनजीसह अनेक वस्तूंच्या किमती आणि नियमांमध्ये बदल होणार आहे.

जुलै महिन्यातील या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 जुलैपासून तुमच्यासाठी काय बदल होणार? हे जाणून घेऊयात…

एलपीजीच्या किंमतीत बदल

देशातील सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी गॅसची किंमत निश्चित करतात किंवा त्यात सुधारणा करतात. यावेळीही एलपीजी गॅसच्या किमतीत 1 तारखेला बदल अपेक्षित आहेत. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतींत कपात करण्यात आली होती, मात्र 14 किलो गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. याच कारणामुळे यंदा घरगुतील एलपीजी सिलेंजरच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

क्रेडिट कार्डच्या खर्चावर 20 टक्के TCS

परदेशात क्रेडिटद्वारे खर्च केल्यास TCS लागू करण्याची तरतूद आहे, जी 1 जुलै 2023 पासून लागू होईल. या अंतर्गत 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 20 टक्क्यांपर्यंत TCS शुल्क आकारलं जाईल, परंतु शिक्षण आणि वैद्यकीय वापरासाठी हे शुल्क 5 टक्क्यांपर्यंत कमी केलं जाईल. जर तुम्ही परदेशात शैक्षणिक कर्ज घेत असाल तर हे शुल्क आणखी कमी करून 0.5 टक्के केलं जाईल

सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींत बदल (CNG and PNG Price)

दर महिन्याप्रमाणे या महिन्यातहीCNG आणि पीएनजीच्या किमतींत बदल होऊ शकतो. दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलियम कंपन्या पहिल्या तारखेला गॅसच्या किमतींत बदल करतात.

ITR दाखल करण्याची शेवटची तारीख

प्रत्येक करदात्याला आयटीआर भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जुलैमध्ये संपत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप ITR भरला नसेल तर तात्काळ 31 जुलैपर्यंत तुमचा आयटीआर रिटर्न फाईल करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *