देशात सर्व शासकीय, निमशाकीय, बँकींगच्या कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आपली ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आधार कार्ड असतो. मात्र याच आधार कार्डवर फोटो एकाचं आणि नाव दुसऱ्याचं असेल तर? एखाद्या आधार कार्डाचा असा दुरूपयोग होऊ शकतो. मात्र असा प्रकार राज्याच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या उपमुख्यमंत्र्याबाबत घडलं तर? चंद्रपूर जिल्ह्यातील एका आठ वर्षाच्या मुलाच्या आधार कार्ड चक्कं राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही, मागील सात वर्षांपासून हे आधार कार्ड वापरात आहे. या आधार कार्डावर त्याने शाळेत प्रवेशाची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. यामुळे आता प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
सात वर्षांपूर्वी काढलं होतं कार्ड चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही या तालुक्यात राहणार आहे. जिगल जीवन सावसाकसोबत हा प्रकार घडला आहे. जिगलच्या जन्मानंतर एका वर्षाने हे आधार कार्ड काढण्यात आले होते. मात्र त्याच्या या आधार कार्डवर चक्कं तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां यांचाच फोटो छापून आला होता.यानंतर या आधार कार्डावरवरील फोटो बदलून घेण्यासाठी जिगलच्या आईने अनेक चकरा मारल्या होत्या. मात्र यामध्ये अजून बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधार कार्ड केंद्र संचालकाने घातलेल्या या गोंधळामुळे जिगलच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरला आहे. जिगल आजही हेच आधार कार्ड वापरतो आहे.