बँकांनी पीक कर्जाचे वाटप करताना दत्तक बँकेची अट शेतकऱ्यांना बंधनकारक करु नये. गरजू शेतकरी त्याला आवश्यक असलेल्या कुठल्याही बँकेतून कर्ज घेण्याचा त्याला अधिकार आहे. तसेच सर्व बँकांनी त्यांना दिलेला लाक्षांक हा पाळणे बँकांना बंधनकारक आहे. ज्या बँका वेळेत लाक्षांक पूर्ण करुन वेळेवर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच वयस्कर खातेदारांना कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात अशा वेळी त्याच कुटुंबातील इतर व्यक्तीनां सहकर्जदार म्हणून घ्यावे व कर्ज वाटप करावे, असी मागणी om raje यांनी केली. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची पीक कर्ज आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना पेरणी पूर्व मुबलक प्रमाणात कर्ज मिळाल्यास कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराच्या दारा समोर उभे राहण्याची वेळ येणार नाही. जिल्हा उपनिंबधक यांनी सर्व सहाय्यक निंबधक यांना या बँका वेळेवर कर्ज वाटप करतात का नाही? याची खातर जमा करावी. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत अनेक लाभार्थी बँकांच्या चुकांमुळे यादीत पात्र नसल्याचे निदर्शनास आले आहे शा बँकांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करता येते का? याची खातरजमा जिल्हाधिकारी यांनी करावी.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने जून्या शेतकऱ्यांकडून पीक कर्ज व व्याज भरुन घेताना तसेच कर्जाचे नुतनीकरण करताना शेतकऱ्यांकडून रोख स्वरुपात रक्कम भरावी, असा फतवा सहकार विभागच्या पत्राचा आधार घेऊन काढला असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. हा फतवा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, त्यामुळे कर्जाचे नुतनीकरण करुन घेताना इतर बँका ज्या पद्धतीने नुतनीकरण करतात तेच धोरण जिल्हा मध्यवर्ती बँकांनी राबवावे.
चालू हंगामात काही बोटावर मोजण्याजोग्या शाखा अधिकाऱ्यांनी पीक कर्जाचे वाटप समाधानकारक केले असून इतर बँकाचे काम समाधानकारक नाही, अशी नाराजी देखील ओमराजे यांनी बोलून दाखवली. सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या लाक्षांका प्रमाणे ५ जूलै २०२३ पर्यंत पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप करावे. या सर्व पीक कर्जाचा आढावा ६ जूलै रोजी घेणार असून या बैठकीत ज्या बँकेचे कर्ज वाटप कमी आहे अशा बँकांवर कारवाई होणारच, असा इशारा देखील ओमराजे यांनी दिला.