मुंबई, 21 जून : गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. पवारांचा राजीनामा ते पक्षाला दोन नवीन कार्याध्यक्ष. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24वा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी जाहीर मागणीच पक्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात केली आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
काय म्हणाले अजित पवार?
25 वर्षांच्या जडणघडणीमध्ये नवीन पिढी पुढे येत आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवली पाहिजे. राष्ट्रीय मान्यता गेली आहे. बरेच जण मंत्री होतात पण स्वतः शिवाय दुसऱ्या कोणालाही निवडून आणू शकत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल आणू शकतात, केजरीवाल दोन राज्य आणू शकतात तर शरद पवार सर्वांत उजवे आहेत की नाही? मग आपण स्वतःच्या ताकदीने राज्यात सरकार का आणू शकलो नाही. मुंबई आणि विदर्भात कमजोर पडलो आहे. मुंबईत अध्यक्ष निवडता आला नाही. सेलमध्ये बदल करायचे की नाही? भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही, अशी स्पष्टी भूमिका यावेळी अजित पवार यांनी घेतली.