मुंबई, 21 जून : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत मुंबईतून मोठी बातमी आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि ex cm उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे.
सुरक्षा रक्षकांना पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश
अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गुंतले होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्ंयामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी केली असून पायलटही कमी करण्यात आला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षादेखील काढून टाकण्यात आली.
मातोश्रीच्या सुरक्षेततही कपात
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी उद्धरे ठाकरे यांना झेड प्लस सिक्युरिटी तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सिक्युरीटी होती. मात्र, आता त्यांची सिक्युरिटीत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील कमी केल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे कुटुंबियांसह मातोश्री जवळपासच्या परिसरातील सुरक्षा देखीलकमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलीस तैनात असतात. मात्र, आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षा कमी केल्यानंतर आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.