• Wed. Aug 20th, 2025

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात, किती जणांना मिळणार संधी झाले स्पष्ट

Byjantaadmin

Jun 18, 2023

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर bjp shinde यांच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यासंदर्भात अपक्ष आमदार अन् शिंदे गटाच्या आमदारांकडून वारंवार दावा केला जातो. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अजून काही ठरला नाही. आता नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली.

निधी वाटपात राष्ट्रवादी नाराज

निधी वाटपात नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. यासंदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, सर्व कामे नियमानुसार होत आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी काय तक्रार केल्या आहेत, हे मला माहीत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार जर निधी कमी मिळत असेल म्हणून तक्रार करत असतील, तर मागच्या काळात काय झाले, ते बघावे. निधी वाटपाबाबत अजित पवार यांनीही तक्रार केली.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात, किती जणांना मिळणार संधी झाले स्पष्ट

अजित पवार जबाबदार

अजित पवार यांनी फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला, म्हणून हा सगळा बेबनाव झाला, उठाव झाला. यामुळे महाविकास आघाडी सरकार जाण्यात जितके उद्धव ठाकरे जबाबदार आहे, तितकेच अजित पवार जबाबदार आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. पण हे सरकार येण्यात आणि आमदार फुटण्यात अर्थमंत्री म्हणून त्यांनीच मदत केलीय. त्यांनी आम्हाला तर एक रुपयाही दिला नाही. पण मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेस त्यांनी किती निधी दिला, हे कागदोपत्री दाखवू का? असे आव्हान अजित पवार यांनी दिले.

काय म्हणाले महाजन

माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, सत्तेत शिवसेना अन् भाजप हे दोन पक्ष असल्यामुळे नावांविषयी आणि खात्यांविषयी चर्चा होत असते. या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आता लवकरच यावर निर्णय होणार आहे. दोन्ही पक्षाचे मिळून दहा जणांना संधी देण्यात येणार आहे. त्यात शिवसेनेतून कोणाला मंत्री करायचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. तसेच भाजपमधून कोणाला मंत्री करावे, कोणाला काढायचे, हा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. म्हणजे विद्यामान मंत्रिमंडळातून काही जणांना वगळण्यात येऊ शकते, असे संकेत गिरीश महाजन यांनी दिले.

नऊ वर्षात मोदींनी व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले आहे. एक खिडकी योजनेसारखे अनेक निर्णय घेण्यात आले. यामुळे व्यापारी, उद्योजक मोदी यांच्या पाठिशी आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *