• Wed. Aug 20th, 2025

कारचा भीषण अपघात, पोलिसासह तिघेजण गाडीबाहेर फेकले गेले, PSIचा दुर्दैवी मृत्यू

Byjantaadmin

Jun 18, 2023

कळमनुरी मार्गावरील माळेगाव जवळ एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. अपघातात पोलिस उपनिरीक्षकाचा (PSI) जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात कार अपघातात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील माळेगाव परिसरातील ही घटना घडली आहे. 50 वर्षीय निळकंठ लक्ष्मण दंडगे अस मयत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

कारचा भीषण अपघात, पोलिसासह तिघेजण गाडीबाहेर फेकले गेले, PSIचा दुर्दैवी मृत्यू

दोनवर्षांपूर्वीच पोलिस उपनिरीक्षक झाले

मयत दंडगे हे औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण गावचे रहिवासी होते. तर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत होते. मागील दोन वर्षापुर्वीच ते खात्यांतर्गत परिक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाले होते. सध्या ते नागपूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

कारबाहेर फेकले गेले

पीएसआय दंडगे हे दोघा मित्रा सोबत आखाडा बाळापूरकडून हिंगोलीकडे कारने प्रवास करीत असतांना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. यात तिघेही कारच्या बाहेर फेकले गेले. तिघांनाही उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दांडगे यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दांडगे यांना मृत म्हणून घोषित केले.

दोन मित्र गंभीर जखमी

दांडगे यांच्यासोबत असलेल्या दोन मित्रांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गंभीर जखमी असून शिवाजी गायकवाड व गजानन राठोड अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

निवृत्त पोलिसाच्या डोक्यात दगड घालून हत्या

दरम्यान, पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंचर येथे निवृत्ती पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. पोलीस खात्यातील निवृत्त वरिष्ठ पोलीस नायक पंढरीनाथ बाबुराव थोरात यांचा डोक्यात अज्ञात व्यक्तींनी दगड घालून हत्या केली आहे.

त्यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना पुण्याच्या मंचर येथे घडली असून. या बाबत संदिप थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *