बेलकुंड मध्ये नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते झाले
औसा:-आज दिनांक 15 जून 2023 रोजी शिवसेना औसा तालुक्याच्या वतीने संपूर्ण तालुक्यामध्ये 110 गावांमध्ये नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचा आयोजन करण्यात आलेला आहे याचा भाग आज दिनांक 15 जून रोजी बेलकुंड येथे सदरील शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने स यांच्या हस्ते करण्यात आले सदरील शिबिर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख य उद्धवजी ठाकरे स यांच्या प्रेरणेने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे व मराठवाडा समन्वयक शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रोहिदास चव्हाण साहेब व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून आज बेलकुंड येथे लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईचे डॉक्टर चव्हाण यांची टीम उपस्थित होऊन सदरील शिबिराला सुरुवात करण्यात आले
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेना ही सर्वसामान्य माणसाला आधारभूत वाटणारी संघटना असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारी संघटना सेवाभाव जोपासणारी संघटना शिवसेनाप्रमुखाच्या विचाराची शिदोरी पाठीवर ठेवून नेहमीच शेतकरी शेतमजूर कामगार युवक माता भगिनी या सर्वांच्या प्रश्नाला वाचा फोडणारी संघटना असून समाजासाठी नेहमीच काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम करणारी शिवसेना आहे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी आज शिवसेना जरी काही गद्दारामुळे अडचणीत आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी षडयंत्र दाखवून केलेलं असलं तरीही समाजाचे देणे विसरून चालणार नाही आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून समाजाची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे असा आदेशच तमाम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला असल्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून औसा तालुक्यातील 110 गावात लोकांची सेवा करण्याचा मानस आहे निश्चितच या भागामध्ये शिवसेनेची बांधणी अत्यंत मजबूत आहे आणि भविष्यात समाज उपयोगी संकल्पनेतून राबवलेले उपक्रम हे निश्चित संघटन बांधण्यासाठी उपयुक्त ठरतील व समाजातील लोकांना शिवसेना आपलीच आहे इद्रड भावना निर्माण होईल यासाठी सदैव आणि सदैव शिवसैनिक आपापल्या भागामध्ये सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र जगत असतात या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी नियोजनपूर्वक शिबिरास योगदान द्यावे असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका जयश्रीताई उटगे माजी तालुका प्रमुख संजय उजळंबे आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने शिवसेना उप जिल्हा प्रमुख श्री विनोद आण्णा आर्य,महीला जिल्हा संघटीका जयश्री ताई उटगे, शिवसेनाऔसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे,उप तालुका प्रमुख आबा पवार, उप तालुका प्रमुख संतोष सुर्यवंशी,उप विभाग प्रमुख महादेव साळुंके मा.युवा सेना शहर प्रमुख गणेश गायकवाड.जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आबा माने. पंचायत समिती सदस्य विनोद भैय्या माने बेलकुंड उपसरपंच सचिन पवार, चेअरमन संतोष हल्करे, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, सतिश वाघमोडे, शिवजी वाघमोडे, लखन रसाळ, सचिन साळुंके, कैलास कांबळे, मंगेश कानकधर, शिंदाळा सरपंच बाबा घोडके, येल्लोरी सरपंच धोंडीराम लखादिवे, शिवशाहीर जेष्ठ शिवसैनिक जयजयराम जगताप आविष्कार माने, वैभव कोरे शिवसैनिक गावातील ग्रामस्थ. उपस्थित होते.