आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जय्यत तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेसनेही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसला आगामी निवडणुका महाविकास आघाडीत लढायची असली तरी, आघाडीमध्ये जागावाटपात मात्र तडजोड न करण्याची भूमिका ही घेण्यात आल्याचे समजते आहे. यानुसारच आता लोकसभेसाठी काँग्रेसला आघाडीतील २७ ते २८ जागा हव्या आहेत. काँग्रेसने नुकताच ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला.भाजपला हिसका दाखवण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करायची अशी काँग्रेसची रणनीती असली तरी, महाविकास आघाडीत जागावाटपात पक्षाची फरपट नको, सन्मानपूर्वक जागा मिळायला हवे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. २०१४ आणि २०१९ सारखी परिस्थिती आता नाही, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला २१ मतदारसंघामध्ये अनुकूल वातावरण असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत मांडले गेले. त्यामुळे जागावाटपात आपण तडजोड करायची नाही, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी प्रदेश काँग्रेस समितीची बैठक पार पडली. याबैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नेते अशोकराव चव्हाण, नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील आदी काँग्रेसजण उपस्थित होते.
काँग्रेसला कोणत्या जागा हव्यात?
काँग्रेसच्या या बैठकीत ४८ मतदारसंघांचा आढाव घेतला गेला. मागील निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली होती. चंद्रपूरमधून दिवंगत बाळू धानोरकर काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते. मात्र यावेळी महाविकास आघाडीत २७ ते २८ जागा पक्षाला मिळाव्यात असा आग्रह काँग्रेसचा असणार आहे.
मुख्यत्वे काँग्रेसला अमरावती, बुलढाणा, रामटेक, नांदेड, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, रावेर, सोलापूर, लातूर, पुणे, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य, उत्तर मध्य मुंबई, भिवंडी, या मतदारसंघांवर काँग्रेसने ठाम दावा केला आहे.vidhrb काँग्रेस व भाजपचीच थेट लढाई आहे. यामुळे भंडारा-गोंदिया ही एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेलसा द्यावी, इतर सर्व जागा काँग्रेसने आपल्याकडे ठेवाव्यात. असाही बैठकीत सूर होता.
kokan काँग्रेसचा फार प्रभाव नाही. यामुळे इथे फार आग्रह दाखवायचा नाही. मात्र भिवंडी मतदारसंघ आपल्याकडेच ठेवायचा. पुणे मतदारसंघ ही आपला परंपरागत जागा आहे. इथे तडजोड होऊ शकत नाही, अशी भूमिका congress आहे. उद्या शुक्रवारी दि.(१६ जून) काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांची पुन्हा एकदा या अनुषंगाने बैठक पार पडणार आहे.