गावातील ऐतिहासिक वेशीवर अवतरले लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव
लातूर :– नुकतेच काही दिवसांपुर्वी 400 किमी वरील अंदरसुल ता. येवला जि. नाशिक येथील काही मंडळी माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेत लोकनेते विलासराव देशमुख साहेबांवर प्रेम करणारे लोक राज्यात व देशात अनेक ठिकाणी असुन या प्रेमापोटीच माजी मंत्री आ. छगनरावजी भुजबळ यांचे सुचनेनुसार अंदरसुल गावामध्ये ग्रामपंचायत ने ठराव घेवून एका वेशीला लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचे नाव दिले असल्याचे सांगितले परंतू हे नाव सध्या खराब होत असल्याचे गावातील मंडळींनी सांगितले. यावेळी लातूर येथील मुकेश राजेमाने हे देखील तेथे उपस्थित होते.अंदरसुल ही मुकेश राजेमाने यांची सासरवाडी असल्याने त्यांनी स्वखर्चाने नाव टाकण्याची तयारी सासऱ्यांकडे दर्शविली व वारंवार पाठपुरावा केला.ग्रामपंचायतचे सदस्य-बाजार समिती नुतन सभापती किसनरावजी धनगे, सासरे राजेंद्रजी जहागिरदार, सरपंच व सदस्य असणारे सासरे योगेशजी जहागिरदार, सदस्य अमोलजी सोनवणे, नरेनजी सोनवणे यांनी याकामी पुढाकार घेतला व जावयांकडून पैसे कसे घेणार असा निरोप पाठवून विलासराव देशमुख साहेबांवरील प्रेमाखातर परत एकदा साहेबांचे नाव या कमानीला दिले याबद्दल समस्त साहेब प्रेमी लातुरकरांतर्फे अंदरसुलकर व अंदरसुल ग्रामपंचायतचे आभार मानले जात आहेत.