एमआरएफचा समभाग 1 लाख रुपयांच्या पार गेला आहे. एक लाखाचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक आहे. एमआरएफ समभाग आज 1.37 टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे त्याची किंमत एक लाख 300 वर गेला. कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे. सेन्सेक्सनं आज पुन्हा 63 हजारांचा टप्पा गाठला.
MRF स्टॉकनं (MRF Stock) मंगळवारी इतिहास रचला. MRF हा एक लाख रुपयांचा आकडा गाठणारा भारतातील पहिला स्टॉक ठरला आहे. बीएसईवर आज हा शेअर 99,500 वर उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारात 1,00,300 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 19 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत गेल्या एका वर्षात हा शेअर 45 टक्क्यांनी वधारला आहे. 17 जून 2022 रोजी MRF समभागांनी BSE वर 65,900.05 या 52 आठवड्यांच्या निचांकी पातळी गाठली होती.