• Sun. Aug 24th, 2025

जागावाटप दिल्लीतूनच, राज्यात कुणालाही अधिकार नाही; बावनकुळेंचं मोठं विधान

Byjantaadmin

Jun 12, 2023

मुंबईः कल्याणध्ये भाजप-शिवसेनेत तू-तू, मैं-मैं सुरु झालेलं आहे. दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी वादावर पडदा टाकण्यात आलेला असला तरी असहकाराच्या ठरावाचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कल्याणध्ये झालेल्या वादानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची भाषा केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काल एकनाथ शिंदे यांनी बोलतांना, ‘भाजप-सेनेतला वाद छोटा होता, तो संपला आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती.आज मात्र बावनकुळेंच्या एका विधानाने पुन्हा राज्याचं राजकारण ढवळून निघालं. बावनकुळे म्हणाले की, लोकसभेचे जागावाटप हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडून होत असतं. दिल्लीतूनच राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत निर्णय होईल.

येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला मदत न करण्याचा निर्णय कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा असहकार ठराव घेण्यात आलेला होता. त्यानंतर वादावर पडदा टाकण्याचं काम भाजप-सेनेतल्या नेत्यांनी केलं होतं.आळंदी प्रकरणावर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, या प्रकरणाचे राजकारण करू नका. जी घटना घडली त्याबाबत सविस्तर माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मलाही वाटतं की, विरोधकांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *