• Sun. Aug 24th, 2025

रिलायन्स लातूर पॅटर्न चा  CET परीक्षेत उत्तुंग भरारी

Byjantaadmin

Jun 12, 2023

रिलायन्स लातूर पॅटर्न चा  CET परीक्षेत उत्तुंग भरारी

 

लातूर : श्री संगमेश्वर चारीटेबल ट्रस्ट संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्न च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे लातूर पॅटर्न मध्ये घवघवीत यश संपादन करून किर्तीमान यश स्थापित केले. दि. १२ / ०६/२०२३ रोजी  सकाळी  ११ वाजता मेडिकल व इंजिनीअरिंग महाराष्ट्र CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेमध्ये मेडिकल CET साठी जवळपास ३.५० लाख विद्यार्थी व इंजिनीअरिंग CET साठी जवळपास ३.१५ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. यानंतर प्रथम वर्ष इंजिनीअरिंग व फार्मसी  साठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया दि. १६/०६/२०२३ पासून सुरु होणार आहे.

श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्न मध्ये एकूण ४४३ विद्यार्थ्यांनी MHT- CET ची परिक्षा दिली यामध्ये आतापर्यंत हाती लागलेल्या निकालानुसार चि. भद्रे शिवकुमार या विद्यार्थ्यांने ९९.९७ परसेंटाइल घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच  कु. दिवाणे शालिनी (९९.८ ८) व चि. पिंपळे मयूर (९९.८७) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला. ९९ परसेंटाइल पेक्षा जास्त ११ विद्यार्थ्यांनी तर ९८ परसेंटाइल च्या पुढे ३१ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. १२ वी बोर्ड परिक्षेप्रमाणे याही परिक्षेत त्रिपुरा तसेच रिलायन्स च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादित केले आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष  उमाकांत होनराव , संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा. राकेश चौधरी, प्रा. रामशंकर यादव, प्रा. सतीश  पाटील, प्रा. मीरा मुंडे, प्रा. एम. आय. शेख, प्रा. तेलंग दीपमाला, अधीक्षक प्रा. श्रीकृष्ण जाधव, प्रा. दीपक होनराव, प्रा. ज्ञानेश्वर पुरी, प्रा. सुप्रिया अंकुलवार, परीक्षा विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी व तसेच शिक्षक-शिकेत्तर कर्मचार्‍यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *