काँग्रेसचे लोकप्रिय नेते तथा कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी त्यांची बंगळूरू येथे जाऊन भेट घेतली. त्यांचा यथोचित सत्कार करीत मनापासून अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी देशमुख यांनी आज सोमवारी (ता. १२) ही भेट घेतली.
ते उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा खास सत्कारही केला. या भेटीवेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणींना DK शिवकुमार उजाळा दिला CONGRESS नेते शिवकुमार एक ऊर्जावान, व्यापक दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर हे प्रत्येकाला अनुभवायला मिळते.
त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली कर्नाटक राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, याची खात्री आहे. त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेबांशी कायमच जिव्हाळ्याचे संबंध होते. विलासराव देशमुख साहेब आज असते तर त्यांना शिवकुमार हे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल मनापासून आनंद वाटला असता, अशा भावन आमदार धिरज देशमुख यांनी या भेटीनंतर व्यक्त केल्या.नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने घवघवीत यश मिळवले. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आणि केंद्रातील विद्यमान मोदी सरकारबद्दल लोकांच्या मनात असेलला राग या निवडणुकीतून व्यक्त झाल्याचा दावा केला जातोय. कर्नाटक राज्यातील काॅंग्रेसच्या विजयात डी.के.शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा होता, असे बोलले जाते. ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील होते, मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले.