• Mon. Aug 18th, 2025

सोलापूरहून अजमेर प्रवास झाला सोपा, रेल्वेकडून विशेष गाडी

Byjantaadmin

Jun 11, 2023

सोलापूर 11 जून : मध्य रेल्वे विभागातील  solapur हे महत्त्वाचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे सोलापुरातील अक्कलकोट आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. तसेच सोलापूरहून इतर राज्यात जाण्यासाठीही भाविकांची वर्दळ असते. आता सोलापूर परिसरातील भाविकांना थेट अजमेरला जाणं सोपं झालंय. भारतीय रेल्वेने सोलापूरहून अजमेरसाठी खास गाडी सुरू केली होती. भाविकांचा प्रतिसाद पाहता आता या गाडीला विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे.

सोलापूरहून अजमेरला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक

सोलापूर हे शहर तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने येथील एसटी सोबतच रेल्वे सुविधाही महत्त्वाचे ठरते. सोलापूरहून अजमेर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. त्यासाठी यापूर्वी रेल्वे विभागाने विशेष गाडीची सुविधा केली होती. विशेष म्हणजे साप्ताहिक असणाऱ्या या गाडीला आठवड्यातून एक दिवस असा राखीव देण्यात आला होता. परंतु, सदरच्या एक्सप्रेसला प्रवाशांची गर्दी पाहता यंदाच्या चालू आठवड्यापासून एक दिवसाची विशेष अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.

एक्सप्रेस मध्ये झालेले बदल

अजमेर- सोलापूर (गाडी क्र. 09627) साप्ताहिक विशेष गाडी अजमेरहून दि. 14.06.2023 पर्यंत धावणार होती, आता ती 13.09.2023 पर्यंत धावणार आहे.

सोलापूर- अजमेर (गाडी क्र. 09628) साप्ताहिक विशेष गाडी सोलापूरहून दि. 15.06.2023 पर्यंत धावणार होती, आता ती 14.09.2023 पर्यंत धावणार आहे.

गाडीच्या थांब्यात बदल नाही

यापैकी विशेष बाब अधोरेखित करत असताना रेल्वे प्रशासनाने सदरच्या विशेष ट्रेनच्या थांबा आणि संरचनेमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचे सांगितले आहे. शिवाय सदरच्या ट्रेनचे आरक्षण तिकीट काढण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲप डाउनलोड डाऊनलोड करण्याचे देखील सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी या ट्रेनचा प्रवास करत असताना रेल्वे प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शिवाय गाडीची वेळ आणि गाडीचे होल्ट स्टेशन्स हे देखील तपासून प्रवास करावा, असे सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *